कोरेगाव भीमात युवकाचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर अपहरण व मारहाणीची गुन्हे दाखल

9 Star News
0
कोरेगाव भीमात युवकाचे अपहरण करुन बेदम मारहाण
शिरूर प्रतिनीधी 
        कोरेगाव भीमा ता. शिरुर येथे एका युवकाचे रात्रीच्या सुमारास कार मधून अपहरण करुन युवकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल बाळासाहेब शिवले, अनिकेत शहाजी शिवले, अक्षय कैलास कोबल व गणेश बाळासाहेब शिवले या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          याबाबत प्रवीण अशोक कोल्हे (वय ३५ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
                     याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील प्रवीण कोल्हे हा युवक रात्रीच्या सुमारास त्याच्या दुकानात असताना काही युवक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून आले, त्यांनी प्रवीण याला त्यांच्या जवळील मध्ये बसवून नरेश्वर मंदिर परिसरात घेऊन जाऊन जुन्या वादातून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देऊन लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली, याबाबत प्रवीण कोल्हे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विशाल बाळासाहेब शिवले, अनिकेत शहाजी शिवले, अक्षय कैलास कोबल व गणेश बाळासाहेब शिवले सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!