आलेगाव पागा ता. शिरूर येथे तेरा वर्षीय मुलीला तुझे नाव आजीला सांगेन अशी धमकी देऊन तिच्या अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सोनवणे( रा. आलेगाव पागा ता. शिरूर जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक जून २०२४ ते ऑगस्ट दरम्यान पीडीत तेरा वर्षीय मुलीला तुझे नाव आजीला सांगेल असे धमकावून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन अत्याचार केले असून याबाबत फिर्यादीवरून आरोपी अशोक सोनवणे याच्यावर बलात्कार सह बाल लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधि. 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे
गुन्हे दाखल करण्यात आले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करीत आहे.
