शिक्रापूर मध्ये पोलिसांना धक्काबुक्की करत दमदाटी

9 Star News
0
शिक्रापूर मध्ये पोलिसांना धक्काबुक्की करत दमदाटी
शिरूर ( प्रतिनिधी ) 
         खैरेनगर ता. शिरुर येथे दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर पोलीस अपघातातील वाहने पोलीस स्टेशन येथे घेऊन जात असताना पोलिसांना अटकाव करुन नंतर पोलीस स्टेशन येथे आमच्या अपघाताची तडजोड करुन द्या असे म्हणून पोलिसांना धक्काबुक्की करत दमदाटी करुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
       याबाबत धनंजय पांडुरंग खैरे, राजेंद्र बाळासाहेब खैरे, दत्तात्रय बाळासाहेब खैरे (सर्व रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय नामदेव चौधर (रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे.) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
                 शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे खैरेनगर ता. शिरुर येथे राम मंदिर समोर दोन वाहनांचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर, पोलीस शिपाई राहुल वाघमोडे, अमोल रासकर हे घटनास्थळी गेले असताना एम एच १२ टी व्ही ९७१८ या डंपर समोर काही इसम उभे होते, दरम्यान पोलिसांनी आम्ही वाहने पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे म्हणत असताना धनंजय खैरे सह काही इसम आम्ही वाहने नेऊन देणार नाही, वाहने पेटवून देऊ असे म्हणून पोलिसांना अटकाव करुन हुज्जत घालू लागले, त्यांनतर दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येथे धनंजय खैरे सह दोघेजण आलेले असताना पोलिसांनी कालच्या अपघाताची तक्रार द्यायची का असे विचारले असताना तिघांनी तुम्ही ड्रायवरला आमच्या समोर आण आणि आमची तडजोड करुन द्या असे म्हणून पोलिसांना दमदाटी करत आरडाओरडा करुन धक्काबुक्की केली, तसेच राजेंद्र खैरे याने आम्ही डोके फोडून घेऊन पोलिसांना गुंतवतो अशी धमकी दिली, यावेळी पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तिघांना ताब्यात घेतले, 
         फिर्यादीवरून पोलिसांनी धनंजय पांडुरंग खैरे, राजेंद्र बाळासाहेब खैरे, दत्तात्रय बाळासाहेब (खैरे सर्व रा. खैरेनगर ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!