शिरूर बाह्य महामार्गावर पुणे अहमदनगर रस्त्यावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे 45 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
रमेश पांडुरंग चैधरी, (वय 62 वर्षे व्यवसाय मजुरी, रा सतराकमान पुला जवळ शिरूर ता शिरूर )
यांनी फिर्याद दिली आहे.
अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 18 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याचे पुर्वी शिरूर बाह्य पुणे नगर महा मार्गावर ऑक्सीगोल्ड टॉकीजचे समोर पुणे अहमदनगर हायवे रोडवर अहमदनगर बाजुकडे जाणारे लेनवर एक 45 ते 50 पुरुषाला अनोळखी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील वाहना भरधाव वेगात चालवुन रहदारीच्या नियमांन कडे दुलक्ष करून धडक देवुन अपघात करून त्याचे डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रताप टेंगले करीत आहे.