शिरूर
( प्रतिनिधी ) पाबळ ता. शिरुर येथे एका महिलेचा विनयभंग करुन महिलेसह तिच्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आशिष हिरामण जाधव, रेखा हिरामण जाधव, अतुल हिरामण जाधव (सर्व रा. झोडकवाडी पाबळ ता. शिरुर जि. पुणे ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे पाबळ ता. शिरुर येथील आशिष जाधव याने विजेच्या तारेवर पाय दिला असल्याने पिडीत महिलेने तारेवरील पाय काढ, शॉक बसेल असे म्हटल्याने आशिष याने महिलेला पकडून महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत मारहाण केल्याने महिलेने आरडाओरडा केला असता महिलेचा भाऊ मध्ये आला असताना आशिषसह रेखा जाधव व अतुल जाधव यांनी महिलेच्या भावाला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आशिष हिरामण जाधव, रेखा हिरामण जाधव, अतुल हिरामण जाधव सर्व रा. झोडकवाडी पाबळ ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक अपेक्षा टाव्हरे या करत आहे.