कान्हूर मेसाईत सीसीटीव्ही सह साहित्य चोरट्यांनी लांबवले
( प्रतिनिधी ) कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील एका बंगल्याच्या शटरचे कुलूप तोडून घरातील साहित्यांसह चक्क सीसीटीव्ही संच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कान्हूर मेसाई ता. शिरुर येथील जगदीश पुंडे हे कामानिमित्त पुणे येथे राहत असून गावी असलेल्या घरी देखील ते येत असतात, पुंडे हे गावी आले असता त्यांना बंगल्याच्या शटरचे कुलूप तुटलेले तसेच आतमध्ये सर्व साहित्य अस्थाव्यस्त दिसल्याने त्यांनी सीसीटीव्ही ची पाहणी केली चोरट्यांनी घरातील कपडे, इलेक्ट्रिक साहित्यतसेच तसेच सीसीटीव्ही संच चोरून नेल्याचे समोर आले, याबाबत जगदीश गंगाधर पुंडे वय ४२ वर्षे रा.यशवंतनगर खराडी पुणे मूळ रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.