कवठे येमाईत दोन दारु अड्डयांवर पोलिसांचा छापा दोघांवर कारवाई

9 Star News
0
कवठे येमाईत दोन दारु अड्डयांवर पोलिसांचा छापा
शिरूर 
( प्रतिनिधी ) कवठे येमाई ता. शिरुर येथील चंदननगर व शितोळे वस्ती येथे काही इसम नागरिकांना गावठी दारुची विकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक कारंडे, पोलीस हवालदार देविदास देविदास खेडकर, उमेश भगत, पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी तेथे जात छापा टाकला असता चंदननगर येथे निलेश बोडरे तर शितोळे वस्ती येथे चंद्रकांत शितोळे हा गावठी दारु विक्री करताना मिळून आला, दरम्यान पोलिसांनी दोन्ही ठिकाणचा दारुसाठा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले, याबाबत पोलीस शिपाई अंबादास अश्रुबा थोरे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी निलेश काळूराम बोडरे व चंद्रकांत तुकाराम शितोळे दोघे रा. कवठे येमाई ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार देविदास खेडकर हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!