कोंढापुरीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
( प्रतिनिधी ) कोंढापुरी ता. शिरुर येथील शेतकऱ्यांने शेतातील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .
बाळासाहेब बापूराव गायकवाड (वय ६४ वर्षे कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.
कोंढापुरी ता. शिरुर येथील बाळासाहेब गायकवाड हे सकाळच्या सुमारास शेतात गेलेले होते, त्यांनतर त्यांचे भाऊ चंद्रकांत गायकवाड हे शेतात गेलेले असताना त्यांना बाळासाहेब यांनी शेतामध्ये झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले, दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, तर बाळासाहेब यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे बोलाले जात आहे तर याबाबत किशोर बाळासाहेब गायकवाड वय ३८ वर्षे रा. कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सरोदे हे करत आहे.
सोबत – बाळासाहेब गायकवाड यांचा फोटो.