मांडवगण फराटात अवैधरित्या देशी विदेशी दारू विकणाऱ्या तात्याश्री हॉटेल व रानजत्रा हॉटेल येथे पोलिसांनी छापा
मांडवगण फराटा ता. शिरुर येथील वडगावरासाई रोड लगत असलेल्या अवैधरित्या देशी विदेशी दारू विकणाऱ्या तात्याश्री हॉटेल व रानजत्रा हॉटेल येथे पोलिसांनी छापा टाकून दोघाजनांवर गुन्हे दाखल केले आहेत तर दारूसाठा जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी प्रकाश पितांबर भालेराव व सुनील काशिनाथ दाते (दोघे रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे वडगाव रासाई परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये देशी विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस शिपाई किशोर वाघ, तानाजी बाबर, पोलीस हवालदार अमोल गवळी, यांनी माहिती मिळालेल्या दोन्ही हॉटेल मध्ये जाऊन छापा टाकला असता पोलिसांना तात्याश्री हॉटेल प्रकाश भालेराव तर रानजत्रा हॉटेल येथे सुनील दाते नागरिकांना देशी विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करताना मिळून आले, यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत दारुसाठा जप्त केला असून दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम हे करत आहे.