सणसवाडीत युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्यांना कोठडी

9 Star News
0
सणसवाडीत युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्यांना कोठडी
शिरूर प्रतिनीधी 
(  प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील चौकामध्ये वडिलांची वाट पाहत उभ्या असेलल्या तरुणीचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या दोघांना नागरिकांनी पकडत पोलिसांच्या हवाली केले आहे.
      रामदास महादेव भालेराव व परमेश्वर नागनाथ धेवडे (दोघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      याबाबत रुपाली परशुराम कायंदे (वय २२ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
                       सणसवाडी ता. शिरुर येथील चौकात रुपाली कायंदे हि युवती तिच्या वडिलांची वाट पाहत उभी असताना अचानक दुचाकीहून दोघेजण आले त्यांनी युवतीचा मोबाईल हिसकावला यावेळी युवतीने आरडाओरडा केल्याने नागरिकांनी पळून जाणाऱ्या दोघांना पकडून दुचाकीसह पोलिसांच्या हवाली केले, तर याबाबत रुपाली परशुराम कायंदे वय २२ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रामदास महादेव भालेराव व परमेश्वर नागनाथ धेवडे (दोघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल केला  असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!