कारेगावात दुचाकीहून दारु वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा

9 Star News
0
कारेगावात दुचाकीहून दारु वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा
शिरूर 
( प्रतिनिधी ) कारेगाव ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर दुचाकीहून दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी दुचाकी व दारुसाठ्या सह ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून प्रदीप बाळकृष्ण वाळके असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
                   कारेगाव ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर यश इन चौकातून एक इसम दुचाकीहून दारुची वाहतूक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना ,मिळाली, त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार वैजनाथ नागरगोजे, उमेश कुतवळ यांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता त्यांना एम एच १४ जि व्ही ६७८७ या दुचाकीहून मध्यभागी बॉक्स घेऊन एक इसम आलेला दिसला, दरम्यान पोलिसांनी त्याला थांबवत झडती घेतली असता त्याच्याजवळ दारुसाठा मिळून आला, यावेळी पोलिसांनी त्याला दुचाकी व दारु साठ्यासह ताब्यात घेत दुचाकी व दारुसाठा जप्त केला, याबाबत पोलीस हवालदार वैजिनाथ रामराव नागरगोजे वय ३५ वर्षे रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदीप बाळकृष्ण वाळके वय ४५ वर्षे रा. बाभूळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे या इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!