रांजणगावात हॉटेलवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल

9 Star News
0
रांजणगावात हॉटेलवर केलेल्या दगडफेकीत ग्राहक जखमी
रांजणगाव एमआयडीसि पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हे दाखल
शिरूर 
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एका हॉटेल चालकाने ग्राहक युवकाला पैसे मागितल्याच्या रागातून चार अज्ञात युवकांनी हॉटेलवर दगडफेक करत हॉटेल मधील साहित्याची नासधूस केल्याची घटना घडली असून यावेळी झालेल्या दगडफेकीत टेक ग्राहक जखमी झाल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे रवी राठोड सह चार अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                  रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे हरिचंद्र खुडे यांचे राजे हॉटेल असून या हॉटेल मध्ये ११ सप्टेंबर रोजी चार युवक आलेले होते त्यांनी फोन पे वर पासे पाठवले असता पैसे न आल्याने खुडे यांनी पैसे आले नसल्याचे सांगितले, मात्र सर्व युवक निघून गेले, त्यांनतर दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी पुणे सदर चार युवक दुचाकीहून हॉटेल राजे येथे आले आणी बाहेरुन हॉटेलवर अंदाधुंद दगडफेक करत हॉटेल मधील साहित्यांसह बाहेरील टपरीचे तोडफोड करुन नासधूस केली, यावेळी हॉटेल मध्ये चहा पीत असलेले बालाजी लक्ष्मण सूर्यवंशी रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे हे जखमी झाले, याबाबत हरिचंद्र विलास खुडे वय ३५ वर्षे रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रवी राठोड ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांसह तीन अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!