धामारी (ता.शिरूर) येथील कान्हुर रस्त्यालगत दिड वर्षे वयाची मादी बिबट्या मृतावस्थेत

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
            धामारी (ता.शिरूर) येथील कान्हुर रस्त्यालगत असलेल्या केंजळ्यांच्या तळ्याजवळ आज (ता.१३) सकाळी साधारण दिड वर्षे वयाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने तिला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
     स्थानिक युवक सागर केंजळे याने सर्वप्रथम पहिल्यावर त्याला बिबट्या झोपल्याचे त्याला भासल्याने त्याने गावातून लोक बोलविले. मात्र कुठलीच हालचाल दिसली नसल्याने व घटनास्थली वनखात्याचे पथक तात्काळ पोहचल्याने बिबट्या मृत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान दोन बिबट्यांच्या झटापटीत हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनखात्याने व्यक्त केला असून त्याच शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्याचे मृत्यूचे नेमके कारण निष्पन्न होणार आहे. 
            याबाबत वनखाते तसेच स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार आज सकाळी सातच्या सुमारास गावातील सागर केंजळे हा युवक आपल्या शेताकडे गेला असता त्याला त्यांच्याच तळ्याच्या खालील बाजूस एक झोपलेला बिबट्या असल्याचे दिसून आले. बिबट्या पाहून तो घाबरला पण त्याने तात्काळ सरपंच अर्जुन भगत, माजी सरपंच संपत कापरे यांना फोन करुन सांगितले. या दोघांनीही तात्काळ वनखात्याला कळविताच वनपाल गणेश पवार, वाहन चालक अभिजित सातपूते, रेस्क्यू प्रमुख हनुमंत कारकुड व वनरक्षक नारायण राठोड यांचे पथक घटनास्थळी दाखल होताच सदर बिबट्या मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. सदर मृत बिबट्याला या पथकाने तात्काळ शिरुर ग्रामिण रुग्णालयात पाठवून त्याचे शवविच्छेदनही केले. प्राथमिक तपासानुसार सदर दिड वर्षे (पूर्ण वाढ न झालेली) वयाची मादी जातीचा हा बिबट्या असून त्याच्या गळ्याभोवती तसेच जबड्यावर आणि मानेखाली जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला असावा. जखमांची ठिकाणे व जखमांची खोली पाहता हा हल्ला दूस-या बिबटयाकडून झाल्याने सदर मृतू संभवत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली. दरम्यान घटनास्थळी वरील वनखात्याच्या टिमला मदतीसाठी सरपंच अर्जुन भगत, माजी सरपंच संपत कापरे, सागर केंजळे, बाळासाहेब चौधरी, सोपान गायकवाड, सुनिल कंजळे आदींनी विशेष मदत केल्याने बिबट्याला तातडीने शिरुर येथे हलविण्यास मदत झाली असून शवविच्छेदनानंतर त्याचा अंत्यविधीही केल्याची माहिती वनखात्याचे वतीने देण्यात आली. 
फोटो -
धामारी (ता.शिरूर) येथील केंजळे तळ्याजवळ दिड वर्षे वयाची मृत मादी बिबट्या.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!