आपटीत इसमाच्या मृत्यू प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
आपटी ता. शिरुर येथील माळवाडी येथे शेतात दोघांना धोकादायक पद्धतीने काम करण्यास सांगितल्याने संतोष केरबा मराठे याचा यात मृत्यु झाला या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी भाऊसाहेब सदाशिव ढगे व सचिन विश्वनाथ ढगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष केरबा मराठे (वय ४३ वर्षे रा. रा. माळवाडी, आपटी ता. शिरुर जि. पुणे )यांचा मृत्यू झाला आहे .
याबाबत अभय संतोष मराठे (वय २२ वर्षे रा. माळवाडी, आपटी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी भाऊसाहेब सदाशिव ढगे व सचिन विश्वनाथ ढगे (दोघे रा. माळवाडी, आपटी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध इसमाचा मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आपटी ता. शिरुर येथील सचिन ढगे यांच्या शेतात भाऊसाहेब ढगे व सचिन ढगे यांनी संतोष मराठे व दिपक केदारी यांना शेतातील कामासाठी बोलावून घेत ट्रक्टरला धोकादायक पद्धतीने मोठे लाकडी ओंडके बांधले, दरम्यान या लाकडी ओंडक्याने धोका होऊ शकतो याबाबत माहिती असताना देखील दोघांनी सदर ओंडका ट्रक्टरच्या सहाय्याने ओढण्यास सांगितला, यावेळी ट्रक्टरने ओढत असताना ओंडका फिरल्याने दिपक केदारी यांच्या कमरेला लागून संतोष यांच्या डोक्यात लागून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच संतोष केरबा मराठे वय ४३ वर्षे रा. रा. माळवाडी, आपटी ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाला, याबाबत अभय संतोष मराठे वय २२ वर्षे रा. माळवाडी, आपटी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी भाऊसाहेब सदाशिव ढगे व सचिन विश्वनाथ ढगे दोघे रा. माळवाडी, आपटी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध इसमाचा मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले असून पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र पाटील हे करत आहे.