रुबी हॉल क्लिनिक शिरूर माणिकचंद मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलचे वतीने हृदय दिना
(हार्ट डे) निमित्त वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते यात मोठ्या संख्येने नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता. यातून नागरिकांना हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी चालण्याचे महत्त्व पटवून दिले आहे.
या वॉकथॉनचे सुरवात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, जैन समाजाचे संघपती भरत चोरडिया यांचे हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली. या वॉकथॉन मधे
वाढत्या हृदयरोग तक्रारीवर चालणे ही सर्वात सोपी आणि सर्वात शक्तिशाली आहे. आपण नियमित शारीरिक हालचालीना प्रोत्साहन देण्यासाठी चालणे महत्त्वाचे असून,वॉकथॉन केवळ हार्ट डे साजरा करण्यासाठी नसून, त्यातून प्रत्येकाच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आठवण करून देत असून, चालल्यामुळे हृदयाच्या व रक्त वाहिन्यांच्या अनेक समस्या दुर होण्यास मदत होत आहे.
डॉ. पुर्वेझ ग्रँट,व्यवस्थापकीय विश्वस्त ,रुबी हॉल क्लिनिक
रुबी हॉल क्लिनिक यांच्या वतीने नागरिकांच्या आरोग्यासाठी सामाजिक बांधीलकी जपून, रुग्णालयातील सुविधा पलीकडे नागरीक निरोगी राहण्यासाठी वॉकथॉनसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यातून समाजात जागरूकता व निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले जातात. यातून हृदयासंबंधी आजार कमी होण्यास मदत होईल.
बेहराम खोडाईजी,सीईओ रुबी हॉल क्लिनिक
रुबी हॉल क्लिनिकबद्दल: रुबी हॉल क्लिनिक हे ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे प्रमुख बहु-विषय रुग्णालय आहे. पुण्यात स्थित, भारताच्या गुणवत्ता परिषदेद्वारे प्रदान केलेल्या आरोग्य सेवेतील 8 NABH प्रमाणपत्रे आणि मान्यता, भारत सरकारचे 'सर्वोत्कृष्ट अवयव प्रत्यारोपण केंद्र' आणि भारताच्या राष्ट्रपतींनी 'सर्वोत्तम वैद्यकीय पर्यटन सुविधा' यासाठी मान्यता दिली आहे. . 1959 पासून समाजाची सेवा करत असलेले, रुबी हॉल क्लिनिक हे , ४ हजार डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे कुटुंब आहे आणि ८५० खाटा, २४ निदान केंद्रे आणि इतर आरोग्य सेवांची श्रेणी असलेली ३ रुग्णालये आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, शारीरिक निष्क्रियता हे हृदयविकाराच्या प्रमुख कारणांपैकी एक असून ,जागतिक स्तरावर दरवर्षी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे 17.9 दशलक्षाहून अधिक मृत्यू होतात. या वॉकथॉनमध्ये समाजातील नागरीकांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्यांमध्ये अधिक शारीरिक हालचालींचा समावेश करण्यास प्रोत्साहित करून या चिंताजनक आकडेवारीचा सामना करण्याचा प्रयत्न केला जातो.