शिरूर
( प्रतिनिधी ) वाघाळे ता. शिरुर येथे पहाटेच्या सुमारास कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी बिबट्या खुराड्यात शिरला मात्र येथील उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या तत्परतेने बिबट्या खुराड्यात जेरबंद झाला असल्याने उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
वाघाळे ता. शिरुर येथे पहाटेच्या सुमारास दादासाहेब सोनवणे यांच्या घराबाहेर कोंबड्या ओरडल्याचा आवाज आल्याने सोनवणे यांनी याबाबतची माहिती शिरुर वनविभागाला दिल्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या आदेशानुसार वनपाल गणेश म्हेत्रे, वन कर्मचारी हनुमंत कारकूड, रेस्क्यू टीमचे जयेश टेमकर, शुभम शिस्तार, ऋषिकेश विधाटे, सुदर्शन खराडे, सचिन गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पिंजऱ्यात बिबट्यास जेरबंद केले. मात्र सदर बिबट्याने तब्बल सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला असून उपसरपंचांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दादासाहेब सोनवणे यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
फोटो खालील ओळ वाघाळे ता. शिरुर येथे खुराड्यात बंद केलेला बिबट्या.