शिरुर (प्रतिनीधी) शिरुर तालुक्यातील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवत स्वतःच्या चारचाकीतुन टाकवे (ता.मावळ, जि.पुणे) येथे घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे परप्रांतीय आरोपीवर बाललैंगिक अत्याचार (पोस्को) तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलीला आरोपीने तिच्या घराजवळुन लग्नाचे अमिष दाखवत त्याने आणलेल्या चारचाकी वाहनातुन तो राहत असलेल्या टाकवे (ता. मावळ जि.पुणे) या ठिकाणी घेवुन गेला. त्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास इतर लोक कामवर गेले असताना पिडीत अल्पवयीन मुलीशी जवळीक साधुन लग्नाचे आमिष दाखवत "अभी आपण दोनो शादी करणेही वाले है तो क्या प्रॉब्लेम है" असे म्हणत फिर्यादीच्या संमतीशिवाय तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यामुळे पिडीत अल्पवयीन मुलीने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे सोनाई मंडल (रा.पश्चिम बंगाल सध्या रा. टाकवे ता. मावळ जि.पुणे) याच्या विरुध्द फिर्याद दिली असल्याने बाल लैंगिक अत्याचारासह बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता काळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.