करडे ता.शिरूर येथे हायवा ट्रक, ट्रॅक्टर कंपनीत लावला नसल्याने कंपनी व्यवस्थापकाला चार जणांची हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने जबर मारहाण

9 Star News
0

शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       करडे ता. शिरूर येथे घरात जात असणाऱ्या कंपनी व्यवस्थापकाला तू माझा हायवा ट्रक व ट्रॅक्टर कंपनीला का लावला नाही असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिक ,लाकडी दांडके व हाताने व्यवस्थापकाला जबर मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       श्रीकांत शिवाचरण साहू ( वय 32 वर्षे, रा. करडे ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. इच्छापूर ता. बालीकुडा जि. जणतसिंगापूर राज्य-ओडीसा ) यांनी फिर्याद दिली आहे 
        याबाबत अमोल विलास देशमुख , प्रणव राजेंद्र जगदाळे , अमोल नितीन देवरे व इतर अनोळखी 1  (सर्व रा. करडे, ता. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे १७ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता फिर्यादी साहू व त्यांचे कंपनीतील तुशार संकपाळ हा सिक्युरीटी त्याचे मोटारसायकलवर  करडे ता. शिरूर   राहत असलेल्या (रूमवर) सोडवण्यास आला व तो रूमशेजारी सोडुन माघारी गेला. फिर्यादी रूममध्ये जात असताना एक ग्रे. कलरची स्वीप्ट कार नंबर एम. एच. 14-एफ. जी. 0078 ही फिर्यादीचे समोर येऊन थांबली. त्यातून अमोल  देशमुख, प्रणव जगदाळे व अमोल देवरे (रा. करडे )असे गाडीतून उतरले व मोटारसायकलवर एक जण अनोळखी आला त्यातील अमोल देशमुख हा फिर्यादीला म्हणाला की, तु माझा ट्रॅक्टर व हायवा गाडी का कपनीला लावली नाही असे म्हणुन हाताने फिर्यादीचे तोंडावर मारले त्यावेळी त्याचेसोबत आलेले प्रणव जगदाळे व अमोल देवरे यांनी गाडीतून हाँकी स्टीक व लाकडी काठी काढली त्यातील एक काठी अमोल - देशमुख यास दिली व त्या काठीने व हॉकी स्टीकने त्यांनी फिर्यादीला मारणेस सुरूवात केली त्यांनी फिर्यादीस पाठीवर व पायावर लाकडी काठीने व हाँकी स्टीकने मारहाण केली मोटारायकल वर आलेल्या अनोळखी माणसाने फिर्यादीस पाठीमागुन धरले होते. ते मारहाण करत असताना फिर्यादी मोठ्याने ओरडले असता त्यावेळी फिर्यादीची पत्नी श्रधांजली ही खाली आली व मोठ्याने ओरडली त्यावेळी ते सर्वजण निघून गेले फिर्यादीस मारहान झाल्याने त्यांनी डाय 112 ला फोन केला तेथे पोलीस आले व  उपचाराकरीता न्हावरा ग्रामीण रूग्णालय येथे घेवुन गेले तेथील डॉक्टरांनी फिर्यादीवर प्राथमीक उपचार करून ससुन पुणे येथे 
पुढील उपचारासाठी पाठवले असता साहू हे ससुन हॉस्पिटल येथे नजाता श्री गणेशा हॉस्पिटल शिरूर येथे उपचार सुरू असून, फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे मारहाण प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करीत आहे.
        

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!