शिक्रापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
मयताची ओळख पटविण्याचे पोलिसांचे नागरिकांना आवाहन
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात हॉटेल शुभम मिसळच्या समोर दुचाकीहून चाललेल्या अज्ञात युवकाला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात अज्ञात युवक ठार झाल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत युवकाची ओळख पटविण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा परिसरात हॉटेल शुभम मिसळच्या समोर एम एच १२ एम जे ३०१४ या दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने एक युवक चाललेला असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसून अपघात होऊन सदर युवक जागीच ठार झाला, त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी त्या युवकाबाबत माहिती घेतली असता काहीही माहिती मिळाली नाही तसेच त्याच्या जवळ कोणतेही ओळखपत्र मिळाले नाही, तर सदर युवकाचे वर्णन वय २८ ते ३० वर्षे, उंची पाच फुट सहा इंच, रंगाने निमगोरा, अंगाने सडपातळ, अंगात हिर्वता रंगाचा शर्ट व नाईट प्यांट, उजव्या हातावर आई अक्षत गोंधलेले असल्याचे दिसून आले, याबाबत ऋत्विक चंद्रकांत चवरे वय २४ वर्षे रा. रामवाडी तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून या युवकाबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९५५२९९८९२० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोल्सिंनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देशमुख हे करत आहे.