शिरूर बस स्थानका बाहेर वाहनाची वाट पाहणाऱ्या पत्रकाराला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
     शिरूर एसटी स्टँड बाहेर न्हावरे येथे घरी जाण्यासाठी पत्नीसह खाजगी वाहनाची वाट पाहणाऱ्या पत्रकाराला दारूचे नशेतधुंद तरुणाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने पत्रकार गंभीर जखमी झाला आहे याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
       दत्तात्रय मारुती कारंडे, (वय ४५ वर्षे, रा.न्हावरे, तालुका शिरूर, जिल्हा-पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
       संतोष राजेंद्र सोमवंशी (वय.33 वर्ष रा.भाजीबीजार शिरूर ता.शिरूर जि.पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
     एक अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजताचे सुमारास  शिरूर एसटी बस स्टॉप चे समोरील पुलाजवळ फिर्यादी पत्रकार दत्तात्रय कारंडे व त्यांची पत्नी आशा असे हॉस्पिटलमध्ये औषध उपचार करून न्हावरे येथे घरी जाण्यासाठी खाजगी वाहनाची वाट पाहत थांबले असताना एक अनोळखी तरुण नाव पत्ता माहित नाही. तो दारू पिल्याचे अवस्थेत फिर्यादी चे जवळ आला व शिवीगाळ केली म्हणून फिर्यादी यांनी त्यास तू आम्हाला शिवीगाळ का करतोस असे विचारले असता त्याने जवळच उभी असलेले रिक्षा मधून लोखंडी रॉड काढून फिर्यादी चे उजव्या हातावर मारून उजव्या हाताचे करंगळी बोट फ्रेंक्चर करून  दुखापत केली. व पत्नी आशा हीस धक्काबुक्की करून दोघांना शिवीगाळ दमदाटी करत  मोटर सायकल वरून  निघून गेला आहे यावरून फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून,
      पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नितीन आगलावे करीत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!