उज्जैन महाकाल दर्शनाने शिरूर हवेलीतील नागरिक प्रसन्न तर माऊलीआबा कटके यांच्या पाहुणचाराने महिला पुरुष गहिवरले...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
      ना होणार माहेरी थाट... ना होणार सासरी थाट.. ना कोणी पुरवणार येवढे हट्ट... परंतु शिरूर उज्जैन महाकाल सहलीत भावाने पुत्राने पुरवला हट्ट.. आणि महाकाल च्या दर्शनाचा पूर्ण झाला घाट...
असे म्हणत अनेक महिलांनी आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख माऊली आबा कटके या भावाचा तर कोणी पुत्राचा महाकाल यात्रेची बडदास्त पाहून महिलांना गहिवरून आले...
        तर उज्जैन जंक्शन रेल्वे स्थानकावर फुलांची उधळण करत वाजत गाजत माऊली आबांनी केले नागरिकांचे स्वागत...
       आणि शिरूर हवेली तालुक्यात रंगली माऊली आबा कटके यांच्या उज्जैन दर्शन सहलीची चर्चा 
           केडगाव ते उज्जैन अशी ही महाकाल दर्शनाची सहल माऊली आबा कटके यांनी आयोजित केली होती. प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेऊन सहलीला जायचं ठरवलं होतं... सहलीचा दिवस उजाडला सकाळी सहाची रेल्वे असल्याने सर्वजण वेळेत केडगाव चौफुला येथे रेल्वे स्टेशनवर पोहोचले 
रेल्वे स्टेशन वर आल्या आल्या सर्वांची स्वागत माऊली आबा कटके व त्यांच्या पत्नी मनीषा काकी कटके यांनी करून लगेचच नाश्त्याची सोय केली.
          पाहता पाहता सर्वजण आपापल्या दिलेल्या नंबरच्या डब्यामध्ये बसले आणि रेल्वे सुरू झाली काही वेळा दिमतीला आपल्यातील काही स्वयंसेवक आले. पाण्याच्या बाटल्या प्रत्येकाला देत होती कोणाला जास्त हवे असेल तरी घ्या असे म्हणत होते. पाहता पाहता काही वेळातच सर्वांसाठी फ्रुटीचा ट्रे आला फ्रुटी संपत नाही तोच दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि प्रत्येकाला पॅकिंग बॉक्समध्ये सुग्रास जेवण आले. जेवण होऊन काही वेळ जात नाही तोच सायंकाळी चार वाजता बिस्कीटचे पुढे आणि चहा आला. काही वेळा त लक्ष्मीनारायणच्या चिवड्याची पाकीट आले. लहान लहान मुलांसाठी बिस्किटे ..
अशीच बडदास सुरू झाली कमी जास्त काही पडते का म्हणून स्वतः माऊली कटके यांच्या पत्नी मनीषा काकी कटके स्वतः प्रत्येक डब्यापासून प्रत्येक महिला पुरुष वृद्ध लहान मुलांची विचारपूस करत होते. लहान मुलांनाही काही हवं असेल तेही या सहलीमध्ये देण्यात येत होते. 
        रेल्वे उज्जैन रेल्वे स्थानकास थांबताच सांगितलेल्या टीमला आणि दिलेल्या गाडीचा नंबर घेऊन नागरिक खाली उतरतात 250 गाड्यांची लाईन या ठिकाणी पाहून लोकही अचंबित झाली 
आपल्या नंबरची गाडीमध्ये प्रत्येकी आठ जण बसून चालक प्रत्येकांना सांगत होता की आपल्याला या धर्मशाळेमध्ये जायचे आरामासाठी मी आज दिवसभर तुमच्याबरोबर राहणार आहे. आणि गाडी धर्मशाळे समोर जातात मोठ्या आदमीने चालक तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर सांगा मी तुम्हाला तिथे फिरून आणेल. धर्म शाळेत जातात प्रत्येकाला गरम पाणी आराम करण्यासाठी बेड त्या ठिकाणी होते काही वेळा खाली येतात प्रत्येकाला उज्जैन शहर व उज्जैन येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाली प्रत्येकाला अतिशय चांगल्या पद्धतीने महाकालचे दर्शन घेऊन प्रत्येकजण सुखवला होता
. डोक्याला महाकालच्या गंध टिळा आणि महाकालचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेला प्रत्येक भक्त माऊली आबा कटके यांना स्वतः आशीर्वाद देत असताना महाकालला आशीर्वाद देण्यासाठी सांगायला विसरला नसेल.
      पुन्हा परतीचा प्रवास आणि खुश झालेले भाविक यांनी माऊली आबा कटके यांना डोक्यावर घेऊन नाचवले आणि मग परतीचा प्रवास त्याच दिशेने आणि तीच बडदास्त ठेवून झाला..... पहाटे कधी केडगाव चौफुला रेल्वे स्टेशन आले आणि मग सर्वच प्रवाशांची जीवाची उलघाल झाली.... प्रत्येक जण माऊली आबा कटके यांना पाहण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्याकुळ झाला होता... माऊलींना पाहताच अनेकांनी त्यांच्या हातात हात दिले... महिला पुरुष यांनी भावाला साद घातली.. तर वृद्ध महिलेंनी माझा बाबा असे म्हणत त्यांच्या गालावरून हात फिरवत त्यांना आशीर्वाद दिले घराकडे निघताना  प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा मात्र ओलावल्या होत्या....
             
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!