सविंदणेत दारु विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात
( प्रतिनिधी ) सविंदणे ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ एक इसम बेकायादेशीपणे देशी विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना ,मिळाली, त्यांनतर पोलीस हवालदार उमेश भगत, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत, होमगार्ड सुरज शिंदे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाका असता त्यांना एक इसम दारुची विक्री करताना मिळून आला, दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या जवळील दारु साठा जप्त केला, याबाबत पोलीस शिपाई भास्कर महादेव बुधवंत वय ३७ वर्षे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी बारकू माहदू पडवळ वय ५५ वर्षे रा. सविंदणे ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उमेश भगत हे करत आहे.
