कवठे येमाईतील अल्पवयीन युवतीचा विनयभंग
कवठे येमाई ता. शिरुर येथील तेरा वर्षीय अल्पवयीन युवती शिरुर येथील शाळेमध्ये शिक्षणासाठी जात असताना वैभव शेळके हा युवक वारंवार युवतीचा पाठलाग करत युवतीच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करु लागला, दरम्यान वैभव याने युवतीला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याने युवतीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने युवतीच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी वैभव शेळके ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करत आहे.
