स्थानिक नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने एक कुटुंब चालेलेल्या कारने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतल्याची घटना घडली मात्र स्थानिक नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला असल्याने कुटुंब सुखरूप बचावले मात्र पूर्ण कार जळून खाक झाली.
शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण रस्त्याने बीडहून आलेला कार चालक विकास बरगजे हा त्याच्या ताब्यातील एम एच ०३ ए टी ४६२४ या कार मधून कुटुंबियांसह चालेलला असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या मध्यभागी कारच्या पुढील भागाने अचानक पेट घेतला, यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, करंदी गावामध्ये रात्रगस्तीवर असलेले सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, गणेश खेडकर, समीर पंचमुख, अमिल कंद्रूप, सोमनाथ सोनवणे, गितेश सोनवणे यांनी तेथे धाव घेत कार मधील कुटुंबियांना बाजूला हलवत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करत केले, मात्र यावेळी कार जळून खाक झाली, दरम्यान नागरिकांनी कार बाजूला करत वाहतूककोंडी सुरळीत केली, सदर घटनेत कुटुंब सुरक्षित राहिले मात्र कारचे पूर्णपणे नुकसान झाले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण रस्त्यावर जळून खाक झालेली कार.
