दिवसा बंद घराची घरफोडी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. सुमारे १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल, मोबाईल असा सुमारे १५ लाख रू.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनची ही धडाकेबाज कारवाई या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणेश गोवर्धन काळे (वय २४ वर्षे), मिलींद ईश्वर भोसले यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी इतर दोन साथीदारांचे मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगितले.
पुणे जिल्हयात बंद घरामध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल झालेने मा. पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख. पुणे ग्रामीण यांनी विशेष लक्ष देवून गुन्हयांची कार्यपद्धती, घटनास्थळ, वेळ याबाबत पडताळणी करण्याच्या सुचना करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.
दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे हे जास्तीत जास्त ग्रामीण भागात घडलेले असल्याने सीसीटीव्ही फुटेजचा अभाव आहे, तसेच बंद घरात चोरी झाल्याने गुन्हयांची नेमकी वेळ कोणती आहे याबाबत परीपुर्ण माहिती मिळणे अडचणीचे होत होते.पोलीस अधीक्षक. पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हयांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना केल्या, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची चार तपास पथके तयार करणेत आली होती.
नारायणगाव पोलीस स्टेशन मधील गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना, अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले यांनी पाटेमळा येथील घटनास्थळी भेट दिलेनंतर स्थानिक इसमांकडील प्राप्त माहितीचे आधारे घटनास्थळापासून काही किमी अंतरावर संशयित दुचाकीवर तीन-चार इसम हे पाटेमळा येथील घटनास्थळाकडून कल्याण-नगर हायवे रोडकडे जाताना दिसले आहेत, अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाने मोटार सायकलचा माग काढत सुमारे १२० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत नगर एमआयडीसी पर्यंत संशयित आरोपींचा माग काढला. उपलब्ध फुटेजचे आधारे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवून गुन्हयाचे कामी आरोपी गणेश गोवर्धन काळे (वय २४ वर्षे), मिलींद ईश्वर भोसले यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी इतर दोन साथीदारांचे मदतीने गुन्हा केला असून त्यापैकी एक अल्पवयीन असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत असल्याने त्यांना विश्वासात घेवून विचापूस केली असता, त्यांनी दिवसा घरफोडी चोरीचे १७ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागिने हे त्यांचे आई वडीलांचे आहेत व त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज आहे असे सोनार व्यावसायिकाला सांगून त्याचेकडे सोन्याचे दागिने तारण ठेवले असल्याचे सांगितले, सदर सोनार व्यावसायिकाकडून सुमारे १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हा करणेसाठी वापरलेली मोटार सायकल, चार मोबाईल असा सुमारे १५ लाख रूपये किंमतीचा (बाजारभावाप्रमाणे) मुद्देमाल जप्त करणेत आलेला असून एकूण १७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत
नारायणगाव,मंचर,खेड,वडगाव निंबाळकर, शिरुर , बारामती शहर,मंचर, नारायणगाव, वालचंदनगर, आळेफाटा,वालचंदनगर, यवत,माळेगाव,सुपा याठिकाणी दिवसा घरफोडीचे १७गुन्हे केल्याने कबूल केले आहे.
गुन्हयातील मिलींद ऊर्फ मिलन ईश्वर भोसले याचेवर अहमदनगर, बीड, पुणे ग्रामीण जिल्हयात घरफोडी, जबरी चोरी मालमत्ता चोरीचे १६ गुन्हे दाखल असून सदर आरोपीने माहे जुलै-२०२३ मध्ये शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गावठी पिस्टलने फायर करून जबरी चोरी केली होती.
सदर गुन्हयातून तो मे-२०२४ मध्ये जामीनावर बाहेर आला आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, स्थानिक पुर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, सचिन घाडगे, संदिप वारे, अक्षय नवले, जनार्दन शेळके, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, तुषार पंदारे, संजू जाधव, सागर धुमाळ, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, ज्ञानदेव क्षिरसागर, राहुल घुबे, रामदास बाबर, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, निलेश सुपेकर, बाळासाहेब कारंडे, आसिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, विनोद पवार, निलेश शिंदे, बाळासाहेब खडके, समाधान नाईकनवरे, राहूल पवार, हनुमंत पासलकर, महेश बनकर, हेमंत विरोळे, विनोद भोकरे, प्रसन्ना घाडगे, काशिनाथ राजापूरे, दगडू विरकर, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम, नंदा कदम, स्वाती पाटील तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संतोष कोकणे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, सुभाष थोरात, अमोल मिडगुले, निलेश जाधव, जितेंद्र पाटील, महिला अंमलदार शुभांगी दरवडे, शीतल गारगाटे, सोनाली गडगे, निता शेळके, कविता गेंगजे यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारायाणगाव पोलीस स्टेशन करत आहेत.