शिक्रापूर ता. शिरूर येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तीन वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केल्या प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर शिक्रापूर मध्ये संतापाची लाट उसळली आहे.
फिर्यादीवरून १४ वर्षे अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पती टेलरिंगच्या कामाकरता गेले होते, त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडित लहान मुलगी घरात खेळत होती, घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर फिर्यादी गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली घरी आले त्यावेळेस घराचा दरवाजा उघडा दिसला, म्हणून घरात पाहिले असता, घरातील बेडवर अल्पवयीन आरोपी याने तीन वर्षीय चिमुरडीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले यावेळी मुलगी ओरडत असल्याने मी त्याला पळत जाऊन ओढले असता तो तिथून पळून गेला, त्यांनतर मुलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, याबाबत फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 65/2 बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4,8,12, नुसार संबंधित वर गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत,
शिक्रापूर येथील 3 वर्षाच्या चीमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा बजरंग सेनेच्या वतीने जाहीर आणि तीव्र निषेध.