शिरूर व राज्यात चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे विभाग व शिरूर पोलिसांनी केली अटक

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
       शिरूर शहरात चारचाकी वाहने चोरणाऱ्या सराईत आंतरजिल्हा टोळीचा म्होरक्या जेरबंद करून तीन गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून दोन चारचाकी वाहने असा एकूण ११ लाख ४० हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे.
     नदीम दाउद शेख (वय ३२ वर्षे रा.मु.पो.थाड ता.जि. बुलढाणा सध्या रा. कुंबेफळ जालना रोड, छत्रपती संभाजी नगर) यास ताब्यात घेतले असून त्याचे साथीदार  विशाल जाधव व किशोर पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचे मदतीने केले असल्याचे कबूल केले. ते दोघे फरार आहेत.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे २६ ऑगस्ट रोजी  योगेश आनंदा गुंड (रा. बाबुराव नगर, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे )यांनी फिर्यादी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात मारूती सुझुकी कंपनीची पांढरे रंगाची इरटीगा कार नं. एम.एच.१२ टी.डी. ०७०२ ही चोरी गेली होती.
       शिरूर परीसरात चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे वाढले होते. सदर गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने चालू करणेत आला सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान वाहन चोरी गेलेल्या ठिकाणापासून सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणेत आले चोरी गेलेले वाहन हे अहमदनगर बाजुकडे गेल्याचे निष्पन्न झाले, अशा प्रकारचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार  नदीम दाउद शेख (रा. बुलढाणा) यानेच सदरचा गुन्हा केला असल्याचा संशय निर्माण झाला, त्यानंतर त्याचेबाबत खात्री करत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्हेगार  नदीम दाउद शेख यानेच शिरूर परिसरात चारचाकी वाहनांची चोरी केली आहे व तो देऊळगाव राजा, बुलढाणा येथे असून त्याचे जवळ गुन्हयातील चोरी केलेली इरटीगा कार आहे. अशी खात्रीशीर बातमी पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेची पथक व शिरूर पोलीस स्टेशनचे पथक यांनी देऊळगाव राजा  येथे सापळा रचून नदीम शेख यास ताब्यात घेतले. नदीम शेख यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने शिरूर व संगमनेर येथे चारचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्याचेकडून इरटीगा कार नं. १२ टी.डी. ०७०२ व स्विफ्ट डिझायर नं. एम.एच. १७ ए. जे. ७०८३ अशा दोन चारचाकी कार एकूण ११ लाख ४० हजार रूपये किंमतीच्या  ऐवज हस्तगत केला असून सदरचे गुन्हे त्याने त्याचे साथीदार  विशाल जाधव व किशोर पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचे मदतीने केले असल्याचे कबूल केले.
 
,*** अशी आहे कार चोरीची अत्याधुनिक पद्धत ***

आरोपी नदीम शेख यास कार चोरी बाबत विचारपूस करता, तो कार चोरी करणेपुर्वी पंजाब राज्यातील जुना बाजार मार्केट मधून OBDstar नावाचे इलेक्ट्रानिक मशीन व कारच्या डुप्लीकेट चावी प्राप्त करून घेत असे. चावीचे मॉडेल हे ज्या वर्षातील आहे, त्याप्रमाणे कारचे मॉडेल चेक केले जाते. त्यासाठी काचेवर नमुद असलेले मॉडेलचे वर्ष पाहून कारचे ड्रायव्हर बाजूचे काचेतून तार किंवा पट्टी टाकून दरवाजा उघडला जातो, त्यानंतर OBDstar नावाचे इलेक्ट्रॉनिक मशीन कारला कनेक्ट करून सिस्टीम चालू करून डुप्लीकेट चावी ही अॅक्टीव्ह केली जाते व कार चालू करून चोरी करतात. कार पुढे तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पाठविली जाते किंवा कारचे स्पेअर पार्ट करून विक्री केली जाते असे सांगितले.
          
        पंजाब येथून उपलब्ध केलेले OBDstar नावाचे इलेक्ट्रानिक मशीन, डुप्लीकेट चाव्या, ड्रिल मशीन, स्क्कु ड्रायव्हर असे साहित्य जप्त केले आहे. आरोपी नदीम शेख याचेवर अहमदनगर, पुणे ग्रामीण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या जिल्हयात चारचाकी वाहन चोरीचे ११ गुन्हे दाखल आहेत. या आरोपीकडून मागील वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने ४ चारचाकी वाहने तामिळनाडू राज्यातून हस्तगत केल्या होत्या.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, पुणे विभागाचे  अपर पोलीस अधीक्षक  रमेश चोपडे, पुणे विभाग, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजु जाधव, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, सागर धुमाळ शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नाथासाहेब जगताप, विजय शिंदे, नितेश थोरात, योगेश गुंड, यांनी केली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!