शिरूर शहरांतर्गत प्रमुखरस्ता पाबळ फाटा ते पाषाणमळा याची अवस्था दयनीय झाली असून याबाबत निवेदनही देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत करत असल्याने शहरातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाच्या निषेधार्थ व लक्ष वेधण्यासाठी या रस्त्यावर बसून रस्त्याला हळदीकुंकू वाहत महाआरती करण्यात आली.
आज १६ सप्टेंबर रोजी पाबळ फाटा ते पाषाण मळा या रस्त्याची महाआरतीचे आयोजन करून शिरूर नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळीराम आवारी, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, संदीप कडेकर, ॲडव्होकेट. सुभाष छाजेड, सागर परदेशी, प्रदीप तिवारी,सुरेश पाटील स्थानिक नागरिक देखील आंदोलनास उपस्थित होते.
शिरूर शहरातील पाबळ फाटा ते पाचानमाळा पर्यंत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे तर अनेक जखमी झाले आहेत या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून शिरूर शहरातील नागरिकांमधून होते. परंतु याकडे शिरूर नगर परिषदेच्या वतीने कायमच दुर्लक्ष केले आहे.
याबाबत अनेक वेळा मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद यांनाही निवेदन दिली आहे तर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनाही या रस्त्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा सांगितले परंतु या रस्त्याचे काम काही होत नाही आता त्यात लवकरच विधानसभा निवडणूक ही लागेल परंतु रस्त्याचे काम काय झाले नाही.
हा रस्ता ताब्यात घेताना शिरूर नगर परिषदेने पाषाण माळातील १७ कमानी पूल या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे काम शासनाकडून करून घेऊन मगच हा रस्ता ताब्यात घेणे गरजेचे होते. कारण या रस्त्याच्या दुरुस्तीला किंवा नवीन रस्ता करण्यासाठी मोठा निधी नगरपरिषदेकडे उपलब्ध होऊ शकत नाही. हे माहिती असतानाही नगरपरिषदेने हा रस्ता ताब्यात घेतला आहे. त्यामुळे या रस्त्याची देखभाल डागडुजी मोठ्या प्रमाणावर करावी लागत आहे .त्यासाठीचे तांत्रिक अवजारे नगरपालिकेकडे नाही.
या रस्त्याला अनेक ठिकाणी मोजता नयेणारे लहान-मोठे खड्डे पडले आहे. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. पाषाणमाळा जवळील पुलाचे कठडे तुटले आहे.
. अनेक वेळा तात्पुरता उपाय नगरपरिषदेच्या वतीने केला जातो परंतु या ठिकाणी खड्ड्यांची संख्या एवढी आहे की ही खड्ड्यांची ठिगळे बुजवणार तरी कशी तात्पुरता विलाज यासाठी नसून कायमस्वरूपी रस्ता चांगला व सुंदर करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
लवकरात लवकर या रस्त्याची कामे नगरपरिषदेने मार्गी लावावी म्हणून आज शिरूर नगरपरिषद प्रशासनाच्या निषेधार्थ व नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील नागरिकांनी या रस्त्यावर बसून गणेशोत्सव काळात शासनाचा निषेध करत या ठिकाणी महाआरती केली आहे.