उरुळी कांचन येथे १४ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती गजबलेल्या ठिकाणीं आर्थिक देवाण घेवानीतुन गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणारा उद्योजक बापू उर्फ दशरथ शितोळे याच्या मुस्क्या गुन्हे शाखेने आवळून त्याला मदत करणारे त्याच्या कुटुंबातील चार जणांना जेरबंद केले असून यात दोन महिलांचाही समावेश आहे.त्यांच्याकडून एक बंदुक तिचे १७५ जिवंत काडतुस व पिस्टलचे ४० जिवंत काडतुसे पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक १८ सप्टेंबर पर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.
बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे(वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे) त्याचे कुटुंबातील इतर सदस्य , निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय ४२ वर्षे), जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे (१९ वर्षे ), आशा सुरेश भोसले (वय ५२ वर्षे ) निखील अशोक भोसले (वय २५ वर्षे सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे) यांचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
१४ सप्टेंबर रोजी २४ रोजी प्रमाणे दाखल असून सदर गुन्हयातील जखमी काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते (दोघे रा. भिवरी ता. हवेली जि. पुणे) यांचे आरोपी यांचे बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि. पुणे )यांचेशी आर्थिक व्यवहार होते. सदर व्यवहारामध्ये फिर्यादी यांचे यातील आरोपीकडे चाळीस लाख रु दीड वर्षापुर्वी दिले होते सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपी यांने फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे म्हणुन त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्यांचे रागातुन आरोपी यांने त्यांचेकडे परवाना असलेले पिस्टल मधुन फिर्यादी व त्यांचे साथीदार काळुराम महादेव गोते यांचेवर जिवेठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून चार राउड फायरिंग करुन काळूराम गोते यांना हाताला व पायाला गोळी लागल्याने गोते गंभीर जखमी झाले होते.
याबाबत उरळी कांचन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती.
उरुळी कांचन सारख्या मध्यवर्ती गजबलेल्या गावाजवळ फायरींग झाल्याने ताबडतोब मा पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, उरुळी कांचन पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना दिल्या त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करुन स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक आरोपी पळून गेल्याचे मार्गाने शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील मुख्य आरोपी हा रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतामध्ये लपुन बसलेला होता, सदर ठिकाणाहुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने आरोपी बापु उर्फ दशरथ विठ्ठल शितोळे (वय ४६ वर्षे रा. इनामदार वस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे) याला ताब्यात घेण्यात येवुन अधिक तपास केला असता सदर गुन्हा हा आरोपी बापु शितोळे यांने त्याचे कुटुंबातील सदस्य निलीमा बापु उर्फ दशरथ शितोळे (वय ४२ वर्षे ) जिग्नेश बापु उर्फ दशरथ शितोळे (१९ वर्षे ) आशा सुरेश भोसले वय (५२ वर्षे ) निखील अशोक भोसले (वय २५ वर्षे सर्व रा. इनामदारवस्ती कोरेगाव मुळ ता. हवेली जि.पुणे )यांचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अटक करून त्यांचें कडून एक बंदुक व एकशे पंच्याहत्तर जिवंत काडतुसे, पिस्टलचे जिवंत चाळीस काडतुस, बीब दोन बॅरल, ०३ खाली मॅग्झीन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड विभागाची पोलीस उपविभागीय अधिकारी बापुराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे, अमित सिद-पाटील, काशीनाथ राजापुरे उरुळी कांचन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार बाळासाहेब कोरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विजय कांचन, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, बाळासाहेब खडके, उरुळी कांचन चे अंमलदार अजित काळे, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड, प्रवीण चौधर, मनिषा कुतवळ, यांनी केली असून, पुढील तपास उरुळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील हे करत आहेत.