शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर हॉटेल सनी समोरुन दुचाकीहून चाललेल्या युवकाला बसची धडक बसून झालेल्या अपघातात तुषार तुकाराम वाळके या युवकाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विकास शेषराव व्हंताळे या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने तुषार वाळके हा त्याच्या ताब्यातील दुचाकीहून चाकण बाजूने जात असताना हॉटेल सनी समोर चाकण बाजूने आलेल्या एम एच १२ के क्यू १७५७ या बसची तुषारच्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला, यावेळी तुषार गंभीर जखमी होऊन तुषार तुकाराम वाळके वय २४ वर्षे रा. उखलगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर याचा मृत्यू झाला याबाबत तुकाराम रामभाऊ वाळके वय ५१ वर्षे रा. उखलगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विकास शेषराव व्हंताळे रा. अष्टविनायक कॉलनी काळेवाडी पिंपरी चिंचवड पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे हे करत आहे.