शिरूर स्टेट बँक कॉलनी ४२ वर्षीय महिलेचा मारहाण करण्यात आली

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
      स्टेट बँक कॉलनी शिरूर येथे दारूच्या नशेत आलेल्या तरुणाने ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश करून ४२ वर्षीय महिलेला शिवीगाळ व मारहाण करून तुझे ब्युटी पार्लर जाळून टाकतो अशी दमबाजी करत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
          महिलेच्या फिर्यादीवरून सतिश शिंदे (पुर्ण नाव माहीत नाही.रा स्टेट बँक काँलनी शिरूर ) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

        याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शिरुर स्टेट बँक काँलनी येथे ४२वर्षीय महीला फिर्यादी  त्यांचे  ब्युटीपार्लरमध्ये काम करत असताना सतिश शिंदे हा दारुचे नशेत तेथे आला व त्याने  ब्युटी पार्लरचा दरवाजा जोरात वाजवीला असता फिर्यादी दरवाजा उघडुन बाहेर आले असता त्याने फिर्यादीस  तुझेमुळे आमचे घरी भांडणे होत आहे असे म्हणुन  जोरा-जाराने अश्लील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन  महिलेची टाँपची काँलर पकडुन हाताने पाठीवर व कानाखाली चापटी मारुन फिर्यादीचे पार्लर जाळुन टाकतो. तु या ठिकाणी कसा व्यवसाय करते ते पाहतो असे म्हणुन मला दमदाटी केली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे  मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर करीत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!