न्हावरे येथील स्वर्गीय रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्व साधारण सभा विरोधकांचा थोडासा गोंधळ... तर कारखाना सुरू होण्यासाठीची चर्चा मात्र शून्य

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील स्वर्गीय रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्व साधारण सभा विरोधकांचा थोडासा गोंधळ तर कारखान्याची चेअरमन ऋषीराज पवार यांनी कारखाना बंद पडण्याचे कारण राज्य शासनावर फोडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा उरकण्यात आली. यावेळी मात्र विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून कारखाना सुरू होण्याबाबत कुठलीही ठोस चर्चा झाली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी मात्र नाराज झाला आहे. 
      विरोधांमधून केवळ पाच ते सात लोक प्रश्न विचारत होते इतर मात्र गप्प राहिले. त्यामुळे विरोधक सक्षम नसल्याचे यामुळे दिसून आले आहे.
        स्वर्गीय रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 33 वी सर्वसाधारण सभा आज कारखाना स्थळी पार पडली. 
        घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे म्हणजेच हा साखर कारखाना मृत अवस्थेत आहे तो जीवित करण्यासाठी विरोधकांनी व सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करावी अशी इच्छा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होती परंतु विरोधक जुने प्रश्न विचारून जुन्या कडीला उत आणत होते. तर सत्ताधाऱ्यांनी मात्र कारखाना बंद होण्याची सर्व कारणे शासनावर ढकलून टाकले 
          सभा सुरू होण्या बरोबर कारखान्याचे व्यवस्थापक यांनी इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली परंतु कारखान्याची माजी संचालक सुधीर फराटे व महेश ढमढेरे यांनी मध्येच प्रश्न विचाराण्यास सुरुवात केली यावेळेस गोंधळ सुरू झाला. परंतु संचालक दादा पाटील फराटे यांनी शांत रहा सर्व विषय आपल्याला घ्यायचे आहेत रात्री बारा वाजले तरी सभा सुरू ठेवू असे कार्यकर्त्यांना व ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना सांगितल्याने गोंधळ शांत झाला. अशोक पवार चोर है , बाप लेक चोर है घोषणा देण्यात आल्या.२ वर्षापासुन घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असुन अशोक पवार यांच्या व्यंकटेश कारखाना मात्र प्रचंड नफ्यात व त्यात पारितोषिकही मिळाले असल्याने घोडगंगा कारखान्याचा सभासदांनी आपली नाराजी व्यक्त केली.  
   यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व माजी आमदार बाबुराव पाचरणे यांची चिरंजीव राहुल पाचर्णे यांनीही मोठ्या प्रमाणात घोडगंगाचे चेअरमन ऋतुराज पवार व आमदार अशोक पवार यांच्यावर आरोप केले.
        यावेळी विरोधक सुरेश पलांडे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखान्यांची चेअरमन ऋषिराज पवार यांना प्रश्न विचारले, त्यानंतर सुधीर फराटे व महेश ढमढेरे यांनी प्रश्नांची सरबती सुरू ठेवली. 
        घोडगंगाचे संचालक आमदार अशोक पवार हे बोलण्यात उठले त्यावेळेस विरोधकांनी उत्तरे चेअरमननी द्यावी असे म्हणून आमदार अशोक पवार व ऋषीराज पवार यांना हिनवले त्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला. यावेळेस ऊस उत्पादक शेतकरी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांनी माईक हातात घेऊन आपल्या जिवाभावाचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू त्याविषयी चर्चा करू उगाच गोंधळ नको असे सांगितले. 
        तरी विरोधक गोंधळ करत होते तर कारखान्याचे चेअरमन ऋषीराज पवार विरोधकांचे प्रश्न लिहून त्याची उत्तरे एकदम देतो असे सांगत होते. प्रत्येकाने विचारलेले प्रश्नांची उत्तरे देतो याच वेळेस कारखान्याची व्यवस्थापक यांनी मात्र विषय पत्रिकेवर सर्वसाधारण सभेसाठी घेतलेली सर्व विषय संपवून टाकले. 
          यानंतर ऋषिराज पवार यांनी कारखान्याचे सभासद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तर विजेचे 17 कोटी रुपये एमएसीबी कडे आपले आहेत त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून दुसऱ्या वर्षीच्या अहवालात ती रक्कम टाकली असल्याचे सांगितले. त्यानंतर कारखाना सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी आपल्या कारखान्याला देण्यात येणारी 107 कोटी राखून ठेवले आहेत. असे सांगून शासनाने आपल्याला वेळेत पैसे दिले नाही किंवा राजकारणामुळे आपल्याला पैसे शासनाने दिले नसल्याचे सांगितले आणि कारखाना बंद पडण्याची कारण शासन असल्याचे सांगितले. कारखाना सुरू करण्यासाठी आमची शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याचे चेअरमन पवार यांनी सांगितले.
        यानंतरही विरोधकांनी गोंधळ करून ठेवला बाप चोर बेटा चोर अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी ऋषीराज पवार यावेळी ऋषिराज पवार यांनी व त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रगीत म्हणण्यात सुरुवात केली आणि घोडगंगा सुरू करण्याचा ठोस निर्णय विरोधक व सत्ताधाऱ्यांनी न घेताच .सर्वसाधारण सभा उरकण्यात आली यात मात्र ऊच उत्पादक शेतकरी चिरडला गेला एवढेच म्हणावे लागेल. या सभेत विरोधकांकडून सहकाराशी गद्दारी खाजगीची निष्ठा असे फ्लेक्स सभास्थळी आणले होते.
     सर्वसाधारण सभेनंतर विरोधकांनी त्याच ठिकाणी सभा घोषणाबाजी करत कारखान्याची चेअरमन व चेअरमन ऋषीराज पवार व आमदार अशोक पवार यांच्यावर आरोप केले. 
         आजच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी अर्वाच भाषा वापरली असून त्याचा निषेध करून, साखर कारखाना सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे शरद पवार यांना घेऊन आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. कारखाना सुरू करण्यासाठी निधी द्या असे म्हणालो असता मुख्यमंत्र्यांनी केवळ एका माणसामुळे तुमचा निधी थांबला असल्याचे सांगितले. 
   आमदार अशोक पवार.
         तर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा. साध्या ड्रेसवर पोलीस कर्मचारी सभेमध्ये ठेवून या सर्वसाधारण सभेमध्ये चोख बंदोबस्त पोलिसांनी ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!