मुलीच्या छेडछाडीच्या व चोरीच्या खोट्या गुन्हयात अडकविण्याची भिती दाखवून खंडणी मागणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
शिरूर दिनांक प्रतिनिधी
मी पत्रकार आहे पोलिसात माझी ओळख आहे तू मुलीची छेडछाड करुन तिचा मोबाईल व पैशाची चोरी केली असल्याचा तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तुला खोट्या गुन्हयात अडवितो अशी धमकी
देत तरुणांकडून खंडणी उकळणाऱ्या चारजणां विरोधात रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला तर दोघांना अटक करून शिरूर न्यायालयात हजर केले असता 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे.
सुमित लक्ष्मण थोरात (वय 32 वर्षे), विशाल नवनाथ देसले (वय 31 वर्षे, रा. रांजणगाव ग.ता. शिरुर, जि. पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.प्रविण जगताप अभय रामटेके (रा. रांजणगाव शिरूर) हे फरार आहे.
श्रीकांत तुकाराम शिंपले (वय 25 वर्षे, मुळ रा. कुंबेफळ, ता. आंबेजोगाई, जि. बीड सध्या रा. रांजणगाव, संकल्पसिटी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री साडेआठ दरम्यान फिर्यादी श्रीकांत शिंपले यास सुमित थोरात व प्रवीण जगताप यांनी प्लंबिंगचे कामासाठी बोलावून काठीने मारहाण करून त्या ठिकाणी एका मुलीस बोलावून तू हीची छेड काढली असून तिच्या मोबाईलची व पैशाची चोरी केली आहे याबाबत तुझ्यावर गुन्हा दाखल करतो असे म्हणत सुमित थोरात यांनी मी पत्रकार आहे माझी पोलिसात ओळख आहे. तुला आता गुन्ह्यात अडकवतोच अशी धमकी देत 25 हजार रुपये खंडणीची मागणी केली व फिर्यादीच्या मोबाईल वरून आरोपीच्या स्कॅनर वरती रक्कम पाठविण्यात सांगितली सदरची रक्कम मोबाईल मध्ये घेऊन ती रक्कम विशाल देसले व अभय रामटेके यांनी संगणमत करून घेतली आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करीत आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे सहाय्यक फौजदार सुभाष गारे, पोलीस हवालदार विलास आंबेकर तेजस रासकर पोलीस कुतवळ पोलीस हवालदार पांडुरंग साबळे यांनी केली आहे.
यातील अटक आरोपी सुमित लक्ष्मण थोरात हा रांजणगाव गणपती येथील स्थानिक रहिवाशी असुन त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे व त्याच्या पोलीसांशी ओळख आहे असे फिर्यादीस सांगुन त्यास विनयभंगाच्या खोट्या केसमध्ये अडकविण्याची भिती दाखवुन खंडणीची मागणी करत २५ हजाराची खंडणी घेतली आहे. त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असुन त्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.
.