शिरुर शहर व पंचक्रोशित मुली व महीला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून पालकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे. शिरूर शहरातून नुकतेच दोन वेगवेगळ्या घटना एक तरुणी व एक महिला बेपत्ता झाली आहे.
ओम रुद्र रेसिडेन्सी, रामलिंग रोड येथिल गौरी प्रीतम जाधव (वय १९) हि महिला घरातुन कोणाला काही न सांगता निघुन गेली आहे.
तसेच रामलिंग रोड, अरुणराव नगर येथुन सोनल रोहिदास खोल्लम (वय ३६) ही महीला राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते असे सांगुन मुलगी श्रावणी खोल्लम (वय २) हिला शाळेतुन सोबत घेवुन गेली ती अदयाप आली नाही. या दोन्ही घटनासंदर्भात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मिसिंगची फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे (दि २९) ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास यातील मिसिंग व्यक्ती गौरी प्रीतम जाधव ही घरातुन कोणास काही एक न सांगता घरातून निघुन गेलेली आहे. बेपत्ता महिलेचे वर्णन उंची ५ फुट, रंग काळा सावळा, नाक सरळ, चेहरा गोल, अंगाने सडपातळ, केस काळे व लांब, हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या. पायात जांभळ्या रंगाची चप्पल, सोबत सॅमसंग कंपनीचा नोट-७ मोबाईल, गळ्यात मनी मंगळसुत्र
दुसऱ्या घटनेमध्ये सोनल रोहिदास खोल्लम ही (दि २) सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास राहत्या घरातुन मोबाईलच्या दुकानात जावुन येते असे सांगुन मुलीला शाळेतुन सोबत घेवुन गेली. ती अद्यापपर्यंत घरी आली नाही.तिचा रंग गोरा, उंची ५ फुट, अंगाने मध्यम, केस लांब सरळ, डावे हातचे मनागटावर इंग्रजीमध्ये रोहीदास नाव व मराठीत ओम, अंगठ्यावर तीन स्टार व उजव्या हातावर श्रावणी नाव अस गोंधलेले, नेसणीस गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, तिच्या सोबत मुलगी श्रावणी खोल्लम (वय २ ) अंगात लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट शाळेचा ड्रेस या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.