रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर दुचाकीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात युवक ठार झाला असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात राहुल बाबासाहेब काशीकर (वय २४ वर्षे सध्या रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उंबरी ता. केज जि. बीड )या युवकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अमोल बाबासाहेब काशीकर (वय ३० वर्षे सध्या रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. उंबरी ता. केज जि. बीड) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरून राहुल काशीकर हा युवक त्याच्या ताब्यातील दुचाकी हून चाललेला असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच १४ जि यु ६१५५ या कारची राहुलच्या दुचाकीला धडक बसून राहुल रस्त्यावर पाडून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान कार चालक घटना स्थळाहून पळून गेला, असून फिर्यादीवरून पोलिसांनी एम एच १४ जि यु ६१५५ या कारवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पासलकर हे करत आहे.