न्हावरे ता. शिरूर टेंपो चालकाला मारहाण करून कोंबड्या घेऊन जाणारे टेम्पोवर दरोडा टाकून त्यातील १ हजार २४० कोंबड्यांची लूट करून त्याची विक्री करून मिळालेली पैसे वाटून घेऊन फरार झालेल्या आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनचे शोध पथकानेदोन वर्षानंतर मोठ्या शिताफीनं अटक केली असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
प्रदिप उर्फ प्रदयुगन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर शिकापुर ता. शिरूर जि.पुणे) याला अटक कऱण्यात आली आहे.
महंमद आलम अब्रार सिद्धिकी (वय ३२ वर्ष, धंदा कोंबडया विकी व्यवसाय, रा. लोकसेवा समिती, इंदिरानगर, आर एस मार्ग मालाड ईस्ट, मुंबई ९७) यांनी फिर्यादी दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे महंमद आलम अब्रार सिद्धिकी फिर्यादी दिली की २०२२ मधे कोंबड्या घेवुन जाणारे टेम्पोवर आरोपी व त्यांचे इतर ७ साथीदार यांनी न्हावरे येथे दरोडा टाकुन दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयांपैकी १२४० कोंबडया के जी एन बॉयलर्स शॉप नं ७, शिरढोण, पनवेल रायगड यांना विक्री करून विक्रीतुन आलेली ४, लाख १८ हजार ३६० रूपये रक्कम आरोपी यांनी वाटुन घेतले होते. यानंतर यातील आरोपी पकडले होते.तर आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुगन शिंदे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचा शोध घेत असताना आरोपी शिक्रापूर येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना गुप्त बातमीदार यांचें मार्फत मिळाल्या नंतर शिरूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीचे आधारे मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापुर परीसरात सापळा रचून आरोपी प्रदिप याला अटक केली आहे.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलीस हवालदार परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, नितेश थोरात, सचिन भोई, रघुनाथ हळणोर, यांचे पोलीस पथकाने केली आहे.