जुन्नर तालुक्यातील ओझर - लेण्याद्री रस्त्यालगत असलेल्या तेजेवाडी (ता. जुन्नर )गावातील वीटभट्टी कामगाराच्या नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने प्राण घातक हल्ला केला यात त्याचा मृत्यू झाला आहे. यां घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दबा धरलेल्या बिबट्याचीचिमुरड्यावर झडप, आजोबांसमोर फरफटत नेलं, आवाज ऐकून नागरिक धावले, पण तोपर्यंत चिमुकल्याचा जीव गेला...
रुपेश तानाजी जाधव (वय ९ वर्षे) असे या मुलाचे नाव आहे.
आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस रुपेश शौचास बसला असताना लगत असलेल्या सोयाबीनच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याने सावज समजून त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ओढून घेऊन गेला.त्यावेळेस समोरच असलेल्या मुलाच्या आजोबांनी आरडा ओरडा करून बिबट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट्याने मुलाला शेजारच्या उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले. त्यावेळेस गावातील नागरिकांना समजले असता गावकरी त्याठिकाणी येऊन वन विभागाला सदर घटनेची सर्व माहिती दिली.
वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी पोहचून मुलाची शोधाशोध सुरु केली, एक ते दिड तासाच्या प्रयत्नानंतर मुलाची बॉडी शेजारच्या उसाच्या शेतात मृत अवस्थेत मिळाली. त्यानंतर मुलाची बॉडी शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठविण्यात आली.
घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले.
सदर ठिकाणी नरभक्षक बिबट्याला पकडण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन तात्काळ पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 10 पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
लगतच्या शिरोली गावहद्दीत 2 पिंजरे यापूर्वीच कार्यरत होते. काल रात्री लगतच्या परिसरातील विद्युत डीपी जळल्यामुळे व पावसामुळे तेथे वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे घरामागे असलेल्या अंधारात ही दुर्दैवी घटना घडली.घटना स्थळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री अमोल सातपुते यांनी तात्काळ भेट दिली व पाहणी करून सरपंच व उपसरपंच व वनकर्मचारी यांच्याशी सदर घटने विषयी चर्चा करून मार्गदर्शन केले.