शिरूर नगर पुणे बाह्य मार्गावर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक...महीला ठार तर मुलगा जखमी

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
      शिरूरजवळ नगर पुणे बाह्य मार्गावर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा जखमी झाला आहे अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        प्रमिला देवराव राठोड (वय ४४ वर्ष) या अपघातात मरण पावले आहेत.तर राम राठोड हा जखमी झाला आहे.
       राम देवराव राठोड (वय २१ वर्ष, मुळ रा. चिखलीतांडा ता किनवट जि नांदेड सध्या रा. हिंजवडी चौक पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
           याबाबत अज्ञात वाहनावर व चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरूर बायपास पुणे अहमदनगर रस्त्यावर हॉटेल राजनंदिनी समोररून फिर्यादी व त्यांची आई प्रमिला राठोड असे दोघे हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं एम एच 26 सी एम 2857 वर जात असताना आई प्रमिला देवराव राठोड हि पाठीमागे बसलेली होती तर फिर्यादी दुचाकी चालवत होता पुणे बाजुकडे जात असताना दुचाकी शिरूर नगर पुणे बाह्य मार्गावर हॉटेल राजनंदिनी समोर आलो असता पाठीमागुन अहमदनगर बाजुकडुन भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली यात फिर्यादी व त्याची आई दोन्ही रस्त्यावर पडले याचवेळी धडक दिलेले वाहनाचे चाक फिर्यादी च्या आईच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे . 
     अपघात नंतर अज्ञात वाहन चालक अपघाताची खबर न देता व आम्हा अपघातग्रस्तांना मदत न करता वाहन घेऊन पळून गेला आहे. 
        फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे करीत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!