एसटी कामगार संपात शिरूरच्या १३ एसटी कामगार संघटनांचा सहभाग.. एस टी बस ठप्प प्रवाशांचा खोळंबा

9 Star News
0
एसटी कामगार संपात शिरूरच्या १३ एसटी कामगार संघटनांचा सहभाग.. एस टी बस ठप्प प्रवाशांचा खोळंबा
शिरूर दिनांक प्रतिनीधी 
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देणे, महागाई भत्ता-घरभाडे भत्ता देणे, खाजगीकरण, सुधारीत जाचक कार्यपद्धती रद्द करणे अशा विविध मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आह शिरूर शहर बस स्थानकातील तेरा कामगार संघटना नी राज्यभरात पुजारलेल्या बंदात सहभागी होऊन आज शिरूर एसटी बसस्थानकात धरणे आंदोलन केले आहे. 
      तर राज्य शासनाने याबाबत दिलेले दिलेले आश्वासन नपाळल्यामुळे एसटी कामगार संतप्त आहे.
      या धरणे आंदोलन व काम बंद आंदोलनात अध्यक्ष - सुनिल जगदाळे ,सुनिल जगताप ,कैलास सुर्यवंशी ,संभाजी थोरात सुभाष ढावरे सुनिल पवार व मोठ्यप्रमाणावर पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
          आज सकाळपासून शिरूर एसटी बस स्थानकातून एकही एसटी बस बाहेर न गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे व प्रवाशांचे हाल झाले आहे. एसटी बस सांगतात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती एसटी सुरू होईल का नाही मात्र याबाबत कुठलीही माहिती प्रवाशांना नसल्याने प्रवासी द्विदा मनस्थितीत होते.
            शिरूर एसटी बस स्थानकातून रोजच्या नऊशे ते हजार एसटी बस यांची येजा असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी बस ने प्रवास करतात एस्टी बस बंद असल्याने व कामगारांनी बंद पुकारल्याने मोठ्या प्रमाणात बस स्थानकात प्रवाशांचे गर्दी झाली प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले.
       आज सकाळपासून शिरूर बस स्थानकातील १३ कामगार संघटनांनी या संपात सहभागी होऊन काम बंद आंदोलन सुरू केले आहे त्यात घोषणाबाजी करीत धरणे आंदोलन पुकारले आहे
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!