पवित्र श्रावण महिन्याच्या शेवटचा सोमवारी रामलिंग मंदिरात आकर्षक मनमोहक फुलांची आरास हर हर महादेव... रामलिंग महाराज की जय... जय घोषात जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज दर्शनाला लोटला हजारोंचा जनसागर यामुळे वातावरण रामलिंगमय झाले होते.
आज पहाटेपासून शिरूरशहर ,पंचक्रोशी, तालुक्यातील व राज्यातील विविध ठिकाणीहून मोठ्या प्रमाणात भाविक रामलिंगाच्या दर्शनासाठी येत होते. पहाटेपासूनच तीन वाजल्या पासून शिरूर शहर ते रामलिंग देवस्थान श्रावण पयीवारी करणारी महिला पुरुष भक्तांनी दर्शनासाठी व शेवटचा श्रावणी सोमवार तसेच श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठा उत्साह या भाविकांमध्ये दिसून येत होता.
मंदिरात जवळच बेलफुल पान घेऊन बसणारी वयोवृद्ध तसेच तरुण महिला पुरुष बेल पान घेण्यासाठी भक्तांना आवाज देताना दिसून आली. रामलिंगाच्या प्रसादासाठी पहाटेपसूनच
पेढ्यांच्या दुकानांनी हा परिसर गोड केला होता.
तसेच लहान लहान बालकांनी हातामध्ये छोटीशी पत्र्याची पेटी घेऊन त्यामध्ये विविध चिन्हे घेऊन येणाऱ्या महिला पुरुष भाविकांना गंधटिळा लावण्याचे काम करीत होती हे करतात असताना भाविकांनी मोठ्या मनोभावाने दिलेली दोन ते दहा रुपयांपासून पैसे घेताना या चिमण्याचा आनंद वेगळाच दिसून येत होता. आंबळे व सरदवाडी येथील भजनी मंडळाच्या वतीने दिवसभर भजन सेवा करण्यात आली.
आशीर्वाद ब्लड सेंटर अहमदनगर व रामलिंग देवस्थान ट्रस्ट शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्याच्या पाचही सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले जवळपास 200 जणांनी रक्तदान केले.
पहाटेपासूनच दर्शन रांग सुरू असल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचारी यांनी रांग व्यवस्थित राहण्यासाठी भाविकांना विनंती करताना दिसून येत होते. तसे देवस्थान ट्रस्टच्या वतीने या भागात चोख बंदोबस्त व भाविकांना कुठली अडचण होऊ नये म्हणून या ठिकाणी स्वतः उभे राहून पाहणी करत असताना दिसून आले. यावेळी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशभाऊ धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे खजिनदार पोपटराव दसगुडे, वाल्मीकराव कुरुंदळे,गोदाजी घावटे, रावसाहेब घावटे , बलदेवसिंग परदेशी,जगन्नाथ पाचर्णे , बबनराव कर्डीले, नामदेव घावटे, दर्शन व भक्तांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून लक्ष ठेऊन होते.