दि नाना स्पॉट शिरूर शहरा जवळ पोलिसांचा स्पॉट पाच पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त दोघांना ठोकल्या बेड्या

9 Star News
0
शिरुर मध्ये पाच पिस्तुल चार काडतुसे घेऊन फिरणाऱ्या दोघांना बेड्या 
शिरूर ( प्रतिनिधी ) 
शिरूर शहरांतील दि नाना स्पॉट हॉटेल जवळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून झाडाझडती घेताच त्याच्याकडे पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतूसे मिळून आली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
       शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सराईतावर पोलीस प्रशासनाने कारवाया केलेल्या असताना नुकतेच शिरुर शहरात पाच पिस्तुल घेऊन आलेल्या दोघांना पोलिसांनी पाच पिस्तुलसह जेरबंद केल्याने तालुक्यात पिस्तुलांचा बाजार भरला आहे का? अशी शंका येत आहे.
       अनिकेत विलास गव्हाणे (वय २० वर्षे रा. गव्हाणवाडी गोपाळवस्ती ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व मंगेश दादाभाऊ खुपटे (वय २० वर्षे रा. जवळा ता. पारनेर जि. अहमदनगर) या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
 
                      या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरुर शहरातील बायपास रोड लगत असलेल्या दि नाना स्पॉट हॉटेल जवळ दोघे युवक पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली, त्यांनतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, यांचें मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे सुचनेने सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी, पोलीस हवालदार नाथा जगताप, रघुनाथ हळनोर, निखील रावडे, विजय शिंदे, निरज पिसाळ यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता त्यांना दोन संशतीय युवक आल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्यांच्या जवळ जात त्यांची चौकशी करत झडती घेतली असता त्यांच्या जवळ तब्बल पाच गावठी पिस्तुलांसह चार जिवंत काडतूस मिळून आले, दरम्यान पोलिसांच्या पथकाने त्यांच्या जवळील सर्व पाच पिस्तुल व जिवंत काडतुसांसह त्यांना ताब्यात घेत अनिकेत गव्हाणे, मंगेश खुपटे अशी त्यांची नावे असून, फिर्यादीवरुन त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गिरी हे करत आहे.
         शिरूर शहराचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतात रोड रोमिओ, गाड्यांच्या काळ्या काचावाले भाई दादा, अल्पवयीन वाहन चालक, यास अनेक गुन्हेगारांनी त्यांच्या कारवाईचा धसका घेतला असून, आता अवैध आचार्य बाळगणाऱ्यांकडे त्यांचा मोर्चा वळल्याने शिरूर शहरातून अनेक गुन्हेगार तडीपार होतील यात शंका नाही 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!