ऊसाचा ट्रेलर अंगावर पडुन तरुणाचा मृत्यू
शिरुर प्रतिनिधी -
शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथील धुमाळवाडी येथे पंक्चर झालेला ऊसाचा डम्पिंग ट्रेलर अंगावर पडुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सचिन दत्तात्रय जगताप ( वय -३२) रा. शिरसगाव काटा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळवाडी येथील शिवारात संतोष दत्तात्रय जगताप ( वय -३५) हे शेतातील ऊस ट्रॅक्टरने बाहेर काढत होते. यावेळी त्यांचा डम्पिंग ट्रेलर पंक्चर झाला होता. पंक्चर काढताना जॅक निसटला होता. त्यामुळे ट्रेलर संतोष यांच्या अंगावर पाडला होता. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.