शिरुर येथील लोकअदालतीत ६१ प्रकरणे निकाली
शिरुर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वाद विवाद मिटवण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी अशी एकुण ६१ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत.
यावेळी ४२१ दिवाणी प्रकरणांपैकी पैकी ०९ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. तसेच २८६५ फौजदारी प्रकरणांपैकी ५२ प्रकरणे निकाली आले आहेत. तसेच दाखल पुर्व १०७३३ प्रकरणांपैकी ६०९०प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेल्या दिवाणी, फौजदारी व दाखल पुर्व प्रकरणांतून एकुण ११ कोटी ९२ लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अकरा रुपये वसुल करण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालतीचे प्रमुख न्यायाधीश जे. ए. झारी साहेब, सह न्यायाधीश डी. बी. डोमाळे साहेब व सह न्यायाधीश टी. एस. वाकडीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीचे कामकाज करण्यात आले.