शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील कृषि सहाय्यक अशोक जाधव हे परिसरात पिकांची पाहणी करत सर्वेक्षण करत असताना सध्या सोयाबीन पिकावर वातावरण बदल तसेच रिमझिम पाऊस यामुळे पाने खाणाऱ्या अळी तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याने वातावरण बदलामुळे सोयाबीन पिकावर किडीचे मोठे संकट आल्याची माहिती कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर सह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पिक घेतले असून सध्या सर्वत्र सोयाबीन पिक वाढीसह फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पिकांची पाहणी करत असताना सध्याचे वातावरण तसेच रिमझिम पाऊस असल्यामुळे सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळी तसेच खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन पिक तणमुक्त ठेवावे, बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक खाद्य वनस्पतीचा नाश करावा, शेतातील किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या व सुरवातीच्या अवस्थेतील अळी ग्रस्त पाने अलगत तोडून किडी सह नष्ट करावी, हिरवी घाटे अळी व तंबाखूची पाने खाणारी अळी या किडीची प्रादुर्भावाची पातळी समजण्याकरिता प्रत्येक किडीसाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे शेतात लावावेत तसेच शेतात इंग्रजी T अक्षरासारखे पक्षी थांबे लावावे म्हणजे पक्षी अळींचा नाश करतील तसेच कृषी सहाय्यकांच्या मार्गदर्शनाने योग्य फवारणी करत पिकांचे नियमित सर्वेक्षण करून आणि किडीने आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन देखील कृषी सहाय्यक अशोक जाधव यांनी केले आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर परिसरात सोयाबीनवर झालेला अळींचा प्रादुर्भाव.