करंदीतून वाहनाच्या बॅटऱ्या चोरणारे तिघे जेरबंदशिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी

9 Star News
0
शिरूर ( प्रतिनिधी ) 
     करंदी ता. शिरुर येथील भारतगॅस फाटा परिसरातील वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या तीन चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शोध विभागाच्या पथकाने चोरीच्या बॅटऱ्यांसह जेरबंद केले आहे.
       अदनान रफिक शेख, रोहन काळूराम भुजबळ व गणेश आजीनाथ कांबळे (तिघे रा. माळीमळा तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पूणे मूळ रा. मिडसांगवी ता पाथर्डी जि. अहमदनगअसे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
                       करंदी ता. शिरुर येथील भारतगॅस फाटा परिसरात उभ्या असेलल्या एम एच ४० सी एम ०७०० या ट्रक सह काही वाहनांच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या, याबाबत सागर तानाजी गाडे वय ३० वर्षे रा. जातेगाव खुर्द ता. शिरुर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्ह्याचा तपास करत असताना बॅटऱ्या चोरणाते युवक तळेगाव ढमढेरे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, रोहिदास पारखे, विकास पाटील, प्रतिक जगताप यांनी तळेगाव ढमढेरे येथे जात गणेश कांबळे याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने बॅटऱ्यासह तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली, त्यांनतर पोलिसांनी अदनान रफिक शेख, रोहन काळूराम भुजबळ गणेश आजीनाथ कांबळे  यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील चोरीच्या पाच बॅटऱ्या जप्त करत त्यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
फोटो खालील ओळ - करंदी ता. शिरुर येथे बॅटऱ्या चोरणारे आरोपी व कारवाई करणारे पोलीस पथक.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!