शिरूर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये आमदार अशोक पवार यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्यावतीने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांनी दंड थोपटले असून या निवडणुकीसाठी मी इच्छुक असून पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याची घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची संचालक दादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पक्षाकडे उमेदवार की मागणी केली आहे उमेदवारी दिली तर माझा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जर पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर महायुतीकडून जो उमेदवार दिला जाईल त्याचा पहिल्या दिवसापासून प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाचा
विकास हा उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्याशिवाय होऊच शकत नाही या विधानसभा विकास काय एका आमदार अशोक पवार यांनी केला आहे का? असा सवाल करत माजी आमदार बाबुराव पाचारणे उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचाही या सिंहाचा वाटा आहे हे आमदार अशोक पवार यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे गरजेचे आहे .
घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा प्रमुख मुद्दा तर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील स्थानिक तरुणांना रोजगार यशवंत कारखाना हे प्रमुख मुद्देअसून, पुणे शिरूर रस्ता हा प्रमुख विषय आहे.
हे विषय हाताळताना कुठल्याही प्रकारे राजकारण ठेकेदारी किंवा कमिशन घेतले जाणार नाही केवळ जनसामान्य लोक शेतकरी यांच्यासाठी मी काम करणार असल्याचेही फराटे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून घोडगंगा सहकारी कारखाना अडचणीत आणण्याचे काम विद्यमान अशोक पवार करत आहे असे आम्ही वेळोवेळी सांगत आहे परंतु आमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष झाले आणि आज कारखाना दुसऱ्या गळीत हंगामातही बंदच राहील असे वाटू लागले आहे कारखान्याची या परिस्थितीला आमदारा अशोक पवारच कारणीभूत असल्याचे आरोपही दादा पाटील फराटे यांनी केला आहे. उगाच उपमुख्यमंत्री अजित पवार निधी देत नाही असे म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचे काम आमदार पवार यांच्याकडून सुरू असून कारखाना बंद झाला का हे अगोदर ऊस उत्पादक शेतकरी व शिरूर तालुक्यातील तमाम जनतेला सांगावे.
येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना याही या तीनही पक्षांचा कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांचा समन्वय असून पक्षाच्यावतीने जो निर्णय दिला जाईल तो आम्हाला मान्य असल्याची फराटे यांनी सांगितले.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना आमदार अशोक पवार यांची वडील स्वर्गीय रावसाहेब दादा पवार यांनी सुरू केला आणि त्यांचे चिरंजीव आमदार अशोक पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडून स्वतःचा खाजगी कारखाना जोमात सुरू ठेवलाय हे राज्यातील पहिले उदाहरण आहे स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचा कारखाना बंद पाडणे