शिरूर प्रतिनीधी
अबब.... मंगलदास बांदलाच्या घरात सापडलं करोडोचे घबाड पाच कोटी साठ लाख रोख रक्कम तर कोट्यावधीची चार घड्याळे , अलिशांन कार महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन ईडीने मंगलदास बांदल यांना अटक करून , मुंबई ई डी कोर्टात हजर केले असता त्यांना 29 ऑगस्ट पर्यंत ई डी कोठडी मिळाली आहे.चौकशीसाठी मुंबईच्या वरळी येथील कार्यालयात नेले आहे.
काल दिनांक २० ऑगस्ट रोजी मंगलदास बांदल यांच्या ईडीने छापेमारी केली होती. काल १६ तासाहून जास्त काळ मंगलदास बांदल त्यांची पत्नी भाऊ यांची चौकशी केल्या नंतर मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्यांना मुंबईतील वरळीत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.
त्यांच्या घरामध्ये पाच कोटी साठ लाख रुपयांची रोख रक्कम महत्त्वाची कागदपत्रे व कोट्यावधी रुपयाची चार घड्याळ सापडले असल्याची प्राथमिक माहिती असून रात्री 11 नंतर त्यांना अटक करून मुंबई येथील वरळी येथील ई डी च्या कार्यालयामध्ये नेले आहे तिथे त्यांची चौकशी सुरू असल्याचे समजते. आज २१ ऑगस्ट दुपारी त्यांना ईडी कोर्टात हजर केले असता त्यांना २९ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी मिळाली असल्याने समजते.
या अगोदर ऑगस्ट २०१७ रोजी मंगलदास बांदल यांच्या घरावर पहिली ईडीची छापेमारी झाली होती. पुन्हा त्यांच्या घरावर छापेमारी झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचे काम केले होते.
मंगलदास बांदल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते तसेच शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये बांदल स्वतः किंवा त्यांच्या पत्नी उभे करणार असल्याची चर्चा रंगली होती. मंगलदास बांदल हे शिवाजी भोसले सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी प्रदीर्घकाळ येरवडा तुरुंगात होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. यापूर्वीही त्यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले होते. ते चौकशीसाठी हजरही झाले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. तसेच त्यांनी माहितीचे काम करूनही त्याच्यावर कार्यवाही मागे राजकारण असल्याचे बोलले जात आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने पुणे जिल्ह्यात व शिरूर हवेली तालुक्यात खळबळ उडाली आहे.