बदलापूर ठाणे येथील घटनेचा निषेध करत शाळेमध्ये मुली सुरक्षित राहण्यासाठी शाळा स्तरावर सखी सावित्री समिती स्थापन करावी व त्या माध्यमातून मुलींच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावी अशी मागणी मनस्विनी महिला उन्नती संस्था शिरूर यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले आहे.
यावेळी मनस्विनी महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्ष वैशाली गायकवाड, डॉ.वैशाली साखरे ,राणीताई भापकर, संजना लोंढे, सुजाता महातेकर, मोनिका राठोड, पल्लवी जगताप ,जयश्री गेलोत नीलम गुप्ता, घमाबाई गुंजाळ परविन शेख पूजा काळे उपस्थित होते.
बदलापूर, ठाणे या ठिकाणी अतिशय लहान शाळकरी मुलींवर, शाळेतील कर्मचारी यानें अत्याचार केले त्यामुळे आमच्या मुली शाळेमध्ये सुरक्षित नाहीत , अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी व हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मुलींना शाळेत सुरक्षितता मिळावी यासाठी शिरूर तालुक्यातील सर्व शाळामध्ये सखी सावित्री समिती स्थापन करणेबाबत शाळेंना आदेश करावेत व तसा शासन निर्णय आहे.
शासन निर्णय होऊन देखील ज्या शाळांनी सखी सावित्री समिती शाळे मध्ये स्थापन केल्या नाही त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी.
तसेच या निवेदनाचा आढावा आम्ही महिला संघटना पुढील 15 दिवसात घेऊ. अन्यथा ज्या शाळा सखी सावित्री समिती स्थापन करणार नाही त्यांच्या गेट समोर महिला संघटना आंदोलन करतील व होणाऱ्या गोष्टींना शासन जबाबदार असतील असा इशाराही देण्यात आला.