बदलापूर मुंबई येथील शाळेतील साडेतीन ते चार वर्षाच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
शिरूर हवेलीचे आमदार ॲड.अशोकबापु पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला.इंदिरा गांधी पुतळा शिरूर ते तहसिलदार कार्यालय मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी तहसिलदार बाळासाहेब मस्के यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, ,जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुजाता पवार, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, युवती तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे,, महीला शहराध्यक्ष स्मिता कवाद, युवती शहराध्यक्ष गीताराणी आढाव,शशिकला काळे, बिजवंत शिंदे, ॲड.रविंद्र खांडरे, हाफिज बागवान,सागर नरवडे, अमोल चव्हाण, राहील शेख, माजी नगरसेविका रोहिणी बनकर, सविता बोरुडे, प्रियंका धोत्रे, तुषार दसगुडे,सुरेश पाचर्णे, संजय चव्हाण, राणी कर्डीले, युवक शहराध्यक्ष अमित शिर्के, राजुद्दिन सय्यद, कलीम सय्यद
सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.
नको आम्हाला भिक्षा आरोपीला द्या शिक्षा, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे
नाही पाहिजे आम्हाला तुमचे 1500 रुपये... आम्हाला आमची बहीण, मुलगी सुरक्षित पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त केला.
यावेळी आमदार अशोक पवार यांनी बदलापूर येथील घटनेचा निषेध करीत राज्यात गृहमंत्री त्यांचा खात्याचा कुठलाही वचक राहिला नाही बदलापूर घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी देण्यासाठी या घटनेचा गुन्हा फास्टट्रॅक चालवावा अशी मागणी ही त्यांनी केली.
राज्यात महिला सुरक्षित नाही त्यात शालेय विद्यार्थिनी चिमुकल्या ही सुरक्षित नाही ही शरमेची गोष्ट असून राज्य शासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई करून आरोपीला तात्काळ फाशी कशी मिळेल याकडे लक्ष द्यावे. राज्याची गृहमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महिला संघटनेच्या वतीने युती तालुका अध्यक्ष संगीता शेवाळे यांनी केली आहे.