शिरूर दिनांक प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा काल कोसळल्याने या पुतळा बसवण्यामध्ये शासनाच्या वतीने मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा प्रकार घडला आहे याचा निषेध करीत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिरूर तालुक्यातील संतप्त शिवप्रेमींनी व सकल मराठा समाज, शिरूर शहर पंचक्रोशी यांनी केली आहे.
ही घटना संपूर्ण हिंदुस्थानातील जनतेसाठी व शिव प्रेमींसाठी निंदनीय व भावना दुखवणारी आहे.
यावेळी शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा समन्वयक संभाजी कर्डिले, अखिल मराठा महासंघाचे अध्यक्ष श्यामकांत वर्पे, सकल मराठा महासंघाचे अध्यक्ष सतीश धुमाळ, योगेश महाजन , मराठी चित्रपट दिग्दर्शक भाऊराव खराडे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रा जगदाळे, संजय बारवकर, खुशाल गाडे,सागर नरवडे,निलेश नवले , सुनिल जाधव, अविनाश जाधव, संपत दसगुडे, स्वप्निल रेड्डी, अनिल पंदरकर, निलेश लटांबळे, बापू पोटघन, सुनिल चौधरी, प्रणव घाडगे, हर्षद ओस्तवाल व मोठ्यप्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट वरील पुतळ्याचे उद्घाटन केले होते. देशाचे पंतप्रधान उद्घाटन करीत असलेले पुतळाचे अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळला असेल तर ही गोष्ट हिंदुस्तान व महाराष्ट्राच्या दृष्टीने शरमेची ची गोष्ट आहे. याचा निषेध सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला.
माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतळ्याच्या निकृष्ट कामाबद्दल पत्रव्यवहार केला होता. तरी सुध्दा प्रशासनाने त्यावर विचार न करता निकृष्ठ दर्जाचे काम केले गेले सदरील कामात भ्रष्टाचार झाला असेल त्याचीही चौकशी व्हावी
सरकारने जरी दोर्षीवर गुन्हा दाखल केला असला तरी अशा कॉन्ट्रॅक्टवर पुन्हा कुठलेही काम देवू नये व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी. तसेच देशातील महापुरूषांचे स्मारक, पुतळे ज्याठिकाणी होत असेल त्याठिकाणी विशेष लक्ष घालून ते काम करावे. जेणेकरून अशा घटना घडनार नाही.
घटनेचा मराठा समाज, शिरूर शहर पंचक्रोषी शिरूर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.